दीपिकाने पुन्हा केली हॉलीवूडला जायची तयारी

दीपिका पदुकोण आता पुन्हा हॉलीवूडला जायची तयारी करायला लागली आहे. हॉलीवूडमधील टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी आयसीएम पार्टनर्सकडे आपल्या हॉलीवूड प्रोजेक्‍टसाठी लागणारे सर्चवर्क करण्याची जबाबदारी सोपवली आहे. ही एजन्सी दीपिकाला हॉलीवूडमधील बिग बॅनर निर्मात्यांचे सिनेमे मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. देशातील सध्याच्या अभिनेत्रींच्या क्रमवारीमध्ये दीपिकाचे नाव सगळ्यात वरचे आहे. भारतातही काही प्रादेशिक भाषांमध्ये ती काम करते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

तेलगू भाषेत प्रभासबरोबर ती एक सिनेमा करणार आहे. सिनेमातून मिळणाऱ्या कमाईच्या बाबतही तिचा क्रमांक बराच वरचा लागतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

ज्या प्रमाणे प्रियांका चोप्रा देशाबरोबर परदेशातही सक्रिय असते, त्याच प्रमाणे विदेशातील सिनेसृष्टीतही आपला जम बसवण्यासाठी दीपिका प्रयत्नशील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

ज्या आयसीएम एजन्सीची मदत दीपिका घेणार आहे, त्या एजन्सीने यापूर्वी जॉन सीना, रेजिना किंग, ओलिव्हिया कॉलमन, लाना कोंडोर, इयान सोमरहल्डर सारख्या कलाकारांना मोठे प्रोजेक्‍ट मिळवून दिले आहेत. दीपिकाने यापूर्वीही हॉलीवूडमधील प्रोजेक्‍ट केले आहेत. 2017 मध्ये रिलीज झालेल्या ट्रिपल एक्‍स- रिटर्न ऑफ झेंडर केजमध्ये ती लीडरोलमध्ये होती. हा सिनेमा जगभरात खूपच हिट ठरला होता, मात्र भारतात त्याला फारच अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.