दीपिका पदुकोणची आज चौकशी

मुंबई – बॉलीवूड ड्रग्ज कनेक्‍शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईत दाखल झाली आहे. नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोने आज दीपिकाला चौकशीसाठी बोलावले आहे.

खासगी चार्टर्ड विमानाने दीपिका गोव्याहून मुंबईला आली आहे. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर दीपिका वरळीतील ब्योमॉंड टॉवरमध्ये असलेल्या आपल्या घरी गेली. 

या पार्श्‍वभूमीवर दीपिकाच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दीपिकाची आज चौकशी होणार असल्याने तिचा पती रणवीर सिंह हा वकिलांची जुळवाजुळव करत आहे. 

दरम्यान, एनसीबीने फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा हिची चौकशी केली. दुसरीकडे एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ सौविक चकवर्तीला अटक केलेली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने एनसीबीला कोठडीत असलेल्या सौविकची तपासणी करण्यास परवानगी दिली आहे.

सारा मुंबईत दाखल

चित्रीकरणानिमित्ताने गोव्यात असणारी सारा अली खान एनसीबीचा समन्स मिळताच मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यावर पत्रकारांना टाळत सारा निघून गेली.

यावेळी तिच्यासोबत आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहीम अली खानदेखील होते. सारासोबतच श्रद्धा कपूरचीही उद्या 26 सप्टेंबर रोजी चौकशी होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.