ग्रीन कलरच्या ड्रेसमुळे दीपिका पादुकोण ट्रोल

बॉलीवूडमधील अभिनेत्री दीपिका पादुकोण फक्‍त उत्कृष्ट अभिनेत्रीच नव्हे, तर खूपच बोल्ड आणि बिंदासही आहे. चित्रपटापासून ते फॅशन सेंस आणि स्टाईलबाबत ती सतत एक्‍सपेरिमेंटल असते. मात्र, हे एक्‍सपेरिमेंट करताना कधी-कधी दीपिकाला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. आताही असेच काहीसे घडले आहे.

मुंबईत नुकताच ग्रासिया मिलेनियल अवॉर्डस सोहळा पार पडला. या सोहळयात दीपिकाने एक ग्रीन कलरचा फुल लेंथ ड्रेस घातला होता. या ड्रेससोबत तिने मॅचिंग ईयररिंग्स आणि केसांमध्ये रिबननुमा बॅंड बांधले होते. दीपिकाचा हा लुक खूपच स्टनिंग वाटता होता. पण सोशल मीडियावर काही लोकांनी या ड्रेसवरून दीपिकाला ट्रोल केले.
एका ट्रोलरने लिहिले की, बायको कोणाची आहे, रणवीर सिंहची की कोणा इतरांची. तर काही जणांनी दीपिकाला “हरी मिर्च’, “रेनकोट’ आणि काही तरी विचित्र अशी टिप्पणी केली. तर दीपिकाच्या काही चाहत्यांनी तिच्या लुकची स्तुती केली.

दरम्यान, दीपिका लवकरच मेघना गुलजार यांच्या आगामी “छपाक’ या ऍसिड हल्ला पिडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय ती कबीर खानच्या “83′ चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंहच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.