शाळेत असताना दीपिका होती मस्तीखोर, पहा तिने शेअर केलेल्या आठवणी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावर चांगलीच ऑक्टिव्ह असते. तिच्या पोस्ट आणि फोटोंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या बऱ्याच आठवणी चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. सध्या तिने तिच्या शाळेतील काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिच्या शिक्षकांचे तिच्याविषयी काय मत होते, हे पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

Oh!🤷🏽‍♀️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने इन्स्टाग्रामवर तिच्या गुणपत्रिकेचे फोटो शेअर केले आहेत. या गुणपत्रिकांमध्ये तिच्या शिक्षकांनी तिला रिमार्क दिला आहे. यामध्ये पहिला रिमार्क असा आहे, की ‘दीपिका शाळेत खूप बडबड करते’. दुसऱ्या रिमार्कमध्ये लिहिलय की, ‘तिने दिलेल्या सुचनांचे पालन करावे’ आणि तिसऱ्या रिमार्कमध्ये लिहिलय, की ‘दीपिका दिवसाढवळ्या स्वप्न बघते’.तिने शेअर केलेले हे रिमार्क पाहून ती शाळेत किती मस्तीखोर होती, याचा अंदाज लावता येऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

Hmmmmm…🤔

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

View this post on Instagram

 

Really!?!?😲

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका लवकरच मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ चित्रपटात झळकणार आहे. तसच रणवीर सिंगसोबतही ती ‘८३’ या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)