मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री काय करतात, काय खातात हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता असते. पण चाहत्यांना सर्वात जास्त उत्सुकता आहे की त्यांची आवडती अभिनेत्री तिच्या बॅगमध्ये काय घेऊन जाते. यातच बॉलिवूडची टॉप मोस्ट अभिनेत्री दीपिका पदुकोणचा विचार केला तर दीपिकाच्या बॅगेत कोणत्या वस्तू आहेत हे आज आपण जाणून घेऊया…
वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, दीपिका पदुकोणने ‘माझ्या बॅगमध्ये काय आहे’ या सत्रात ती आपल्या बॅगमध्ये कोणत्या आवश्यक गोष्टी ठेवते हे दाखवले.
दीपिकाच्या बॅगेत हँगओव्हरपासून सुटका करण्यासाठी खास औषध आहे.
दीपिका पदुकोणने सांगितले की, ती तिच्या बॅगमध्ये हँगओव्हरपासून फ्री होण्यासाठी औषध ठेवते आणि त्या औषधाचे नाव अलका सेल्टझर आहे. या हॅंगओव्हर रिलीफ टॅब्लेटमुळे डोकेदुखी, अंगदुखी, थकवा यांसारखी हॅंगओव्हरची लक्षणे कमी होतात.
या विशेष औषधाशिवाय दीपिका पदुकोण माऊथ फ्रेशनर, पेन्सिल-डायरी देखील ठेवते. अभिनेत्रीने सांगितले की, हे तिच्यासाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय दीपिका तिच्या बॅगेत नेहमी सेफ्टी पिन आणि बँडेज ठेवते.
दीपिका पदुकोण सध्या कान्समध्ये तिची धमाल करत आहे. दीपिकाचे अनेक लूक समोर आले आहेत. दीपिकाची प्रत्येक शैली चाहत्यांची मनं जिंकत आहे. कधी सिक्विन साडी तर कधी लाल गाऊन, दीपिकाने तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांना थक्क केले. अभिनयापासून फॅशनपर्यंत सर्वच बाबतीत दीपिका पहिल्या क्रमांकावर आहे.