Diljit Dosanjh and Deepika Padukone | गायक दिलजित दोसांजच्या कॉन्सर्टची सध्या जगभरात चांगलीच चर्चा सुरू आहे. नुकतेच त्याचा बंगळुरू शहरात एक मोठा लॉईव्ह कॉन्सर्ट शो झाला. त्याच्या या लाईव्ह कॉन्सर्टला देखील तरुण-तरूणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. विशेष म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही यावेळी हजेरी लावली होती. इतकेचं काय तर तिने पंजाबी गाण्यावर ठेका धरल्याचे देखील पाहायला मिळाले.
आई झाल्यानंतर दिलजित दोसांजच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ती पहिल्यांदाच झळकली आहे. विशेष म्हणजे सामान्य प्रेक्षकांमध्ये थांबून ती कार्यक्रमाचा आनंद लुटताना दिसली. दिलजितच्या गाण्यावर तिने डान्स केल्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दीपिकाने पांढरा टॉप आणि जीन्स परिधान केली असून ती भांगडा करताना दिसत आहे, तर दिलजीत स्टेजवर परफॉर्म करत आहे. यावेळी दिलजीतने पारंपरिक पंजाबी ड्रेस परिधान केला होता. Diljit Dosanjh and Deepika Padukone |
Diljit Dosanjh acknowledges Deepika Padukone’s work and thanks her for coming to his concert in Bangalore ♥️#DeepikaPadukone #DiljitDosanjh pic.twitter.com/9FJ2449SpP
— Deepika Padukone Fanpage (@DeepikaAccess) December 6, 2024
एका व्हिडिओमध्ये दीपिका आणि दिलजीत एका गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत. आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दीपिका त्याला काही कन्नड ओळी शिकवताना दिसत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या आहेत. पुढे, दिलजीत दीपिकाचे कौतुक करतो आणि म्हणतो, ‘तुमचा विश्वास बसेल का मित्रांनो, आपण मोठ्या पडद्यावर पाहिलेली सर्वात सुंदर अभिनेत्री आज आपल्यामध्ये आहे. स्वत:च्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, आम्हा सर्वांना अभिमान आहे.’ Diljit Dosanjh and Deepika Padukone |
दिलजितने इन्स्टाग्रामवर दीपिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत दीपिका देखील दिलजितचे आभार मानताना दिसत आहे. दरम्यान, दीपिका शेवटची नाग अश्विनच्या ‘कल्की 2898 एडी’ मध्ये प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्यासोबत दिसली होती. याशिवाय अलीकडेच ती रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’मध्येही काम केले आहे.
या वर्षी 8 सप्टेंबर रोजी दीपिकाआणि रणवीर सिंगने त्यांची मुलगी दुआचे स्वागत केले. मुलीच्या जन्मापासून तिने कामापासून ब्रेक घेतला आहे. मात्र नुकतीच ती दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये पाहायला मिळाली.
हेही वाचा:
ED Raid | ईडीचे मुंबई व अहमदाबादमध्ये छापे; करोडो रुपयांची मालमत्ता जप्त