मुंबई – सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘दीपिका पादुकोण’ने आतापर्यंत अनेक एकापेक्षा एक हीट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशतात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे दीपिका आपला पती अभिनेता रणवीर सिंगसोबत मुंबईत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.
दीपिका वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच दीपिकाने आपल्या घरातून मुंबईचे विहंगम दृश्य कॅमेरात टिपले आहे. हा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या फोटोला तिने ‘मॅक्झिमम सिटी असे नाव दिले असून सोबत नो फिल्टर’ असे हॅशटॅग दिले आहे. या फोटोत मुंबईतील टोलेजंग इमारती, वांद्रे-वरळी सी लिंक आणि ढगाळ वातावरण दिसत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोग्राफी कौशल्याचे कौतुक करत तिला हार्ट इमोजी दिल्या आहेत.
View this post on Instagram
👩🏽🏫 @worldeconomicforum @tlllfoundation #wef20 #crystalaward2020 #crystalawards