मुंबई – दीपिका पादुकोन आता Levi’s या ग्लोबल ब्रॅंडची ऍम्बेसेडर झाली आहे. या डेनिम ब्रॅंडच्या मते दीपिका ब्रॅंड ऍम्बेसेडर झाल्याने ते नवीन पिढीतील महिलांना त्यांच्या ब्रॅंडकडे आकर्षित करू शकतील. दीपिका ही भारतातील या ब्रॅंडचा चेहरा बनणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे.
दीपिका आता Levi’s या नवीन ब्रॅंडच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होणार आहे. या ब्रॅंडमध्ये सामील झाल्यानंतर दीपिकाने तिचा फोटोही शेअर केला आहे.
या व्यतिरिक्त दीपिकाला या ब्रॅंडशी जोडल्यानंतर Levi’s ने तिच्यासाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे. नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ट्रोलरचा क्लास काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं सोशल मीडियावर दीपिकाला अपमान जनक मेसेज केला होता.
दीपिकानं त्या ट्रोलरचा चांगलाच क्लास घेतला आणि त्याचा मेसेज सर्वांसमोर शेअर केला. या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना दीपिकानं लिहिलं की, ‘हा मेसेज पाहून तुमच्या कुटुंबीयांना नक्कीच अभिमान वाटेल.’
वर्क फ्रंटबद्दल बोललं तर दीपिका सध्या बऱ्याच मोठ्या चित्रपटांवर काम करत आहे. ती सध्या शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री कबीर खान दिग्दर्शित 83 मध्ये पती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.