संजय लिला भन्साळींच्या “बैजू बावरा’ची सध्या खूप चर्चा सुरू आहे. या सिनेमाच्या कास्टिंगबद्दल सध्या खूप बातम्या ऐकायला मिळत आहेत. पहिल्यांदा रणबीर कपूर,
नंतर कार्तिक आर्यन आणि शेवटी रणवीर सिंहला लीड रोल देण्यात आला आहे. आता असे समजते आहे की, दीपिका पदुकोण देखील या सिनेमाच्या टीममधून बाहेर पडली आहे.
रणवीर सिंह आणि दीपिकाच्या जोडीला पडद्यावर एकत्र बघण्याची संधी मिळणार म्हणून या जोडीचे फॅन खूष झाले होते. पण आता त्यांची निराशा झाली आहे. रोजरोया दोघांनी एकत्र काम केले असते तर ते पाचव्यांदा एका सिनेमामध्ये एकत्र दिसले असते.
दीपिकाने सिनेमा सोडण्यामागील कारण म्हणजे मानधन असल्याचे समजते आहे. पती रणवीर जितके मानधन घेणार त्यापेक्षा एक पैसाही मानधन कमी घेण्यास दीपिका तयार नाही. दीपिकाला इंडस्ट्रीतील सव्र लीडिंग ऍक्टर इतकेच मानधन मिळत आले आहे.
मात्र “बैजू बावरा’च्या बाबतीत तसे होणार नाही. याबाबतची विनंती दीपिकाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे दीपिकाला हा सिनेमा सोडावा लागला आहे. आता तिच्या जागेवर कोणाची निवड होणार हे बघायला पाहिजे.