“द इंटर्न’ हॉलीवूडपटाच्या रिमेकमध्ये दीपिका

दीपिका पादुकोणने अभिनयामध्ये आपला करिष्मा दाखवल्यानंतर निर्मितीच्या प्रांतात पाऊल ठेवले. अलीकडेच तिच्या निर्मितीगृहाने बनवलेला “छपाक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याची चांगलीच चर्चाही झाली. आगामी “83′ या चित्रपटाच्या निर्मितीचीही जबाबदारी दीपिकाकडेच आहे. या चित्रपटातही “छपाक’प्रमाणेच ती अभिनय करणार आहे.

 

View this post on Instagram

 

? J’adore @dior #dior

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


आता दीपिका आणखी एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे. याही चित्रपटात ती अभिनय करणार आहे. हा चित्रपट “द इंटर्न’ या हॉलीवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपटाचा इंडियन रिमेक असणार आहे. या चित्रपटात अभिनेते ऋषी कपूर हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अलीकडेच दीपिकाने आपल्या ट्विटर अकौंटवरुन याविषयीची माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

as if flowers are ever enough!????

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


दीपिका या चित्रपटाबाबत अत्यंत उत्सुक आहे. हा चित्रपट 2021 मध्येप्रदर्शित होणार आहे. “द इंटर्न’ हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हॉलीवूडमधील एक कॉमेडीपट आहे. रॉबर्ट दी नीरो आणि ऍनी हॅथवे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात 70 वर्षांचा एक विधुर दाखवण्यात आला असून निवृत्तीनंतर घरात बसून राहण्याची त्याची तयारी नाहीये.

 

View this post on Instagram

 

?#chhapaakpromotions

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


यासाठी तो एका ऑनलाईन फॅशन स्टोअरमध्ये इंटर्नशिप करतो. तिथे असणारी एक महिला बॉस सतत त्याच्यावर संशय घेत असते. असे काहीसे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूडचा एकेकाळचा चॉकलेट हिरो आणि कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करून परतलेला ऋषी कपूर आणि बॉलीवूडची आघाडीची नायिका दीपिका यांची जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.