लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ‘दीप-वीर’ पोहचले तिरूपतीला

मुंबई – बॉलीवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणार हॉट कपल म्हणजेच दीप-वीर अर्थात रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर 2018 ला हे कपल लग्नबंधनात अडकल. आज दीप-वीरच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. आजच्या या खास दिवसानिमित्त दोघेही आंध्रप्रेदशातील तिरूपती मंदिरात आशिर्वाद घेण्यासाठी गेले होते.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. दीपीकाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दोघेही अत्यंत सुंदर दिसत होते. यावेळी दीपिकाने लाल रंगाची साडी परिधान केली होती, तर सोनेरी रंगाच्या शेरवानीमध्ये रणवीर देखील सुंदर दिसत होता. यावेळी दोघांचाही अंदाज पाहण्यासारखा होता.

…आणि अशाप्रकारे सुरू झाली दीप-वीरची प्रेमकहाणी

दीपिका आणि रणवीरने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केल होते. या चित्रपटादरम्यान दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाल्याचे म्हटले जाते. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या राम-लीला या चित्रपटात पहिल्यांदा दीपिका आणि रणवीर यांनी स्क्रिन शेअर केली होती, आणि याच चित्रपटादरम्यान दोघांनामध्ये जवळीक वाढायला सुरुवात झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या दोघांनी भन्साळींच्या एक नाही तर तीन चित्रपटात एकत्र काम केले आहे. २०१३ मध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला, दुसरा २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाजीराव- मस्तानी’ आणि तिसरा ‘पद्मावत’ या चित्रपटात काम केले. आता लवकरच ते पुन्हा एकदा ’83’ चित्रपटात एकत्र झळकणार आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)