बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि सध्या छपाक या ऍसिडहल्लाग्रस्त तरुणीच्या आयुष्यावर आधारलेल्या चित्रपटामुळे चर्चेत असलेली दीपिका पादुकोण येणाऱ्या काळात पुन्हा एकदा सोबत झळकण्याची शक्यता आहे.
त्याच्या जेंडर केज 4 या चित्रपटामध्ये दीपिकाला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
2017 मध्ये ट्रिपल एक्स या चित्रपटात दीपिकाने डिजलसोबत सेरेनाची व्यक्तिरेखा साकारली होती आणि या चित्रपटाच्या माध्यमातून तिनेहॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
आता या सीरीजच्या पुढील भागात दीपिकाला पुन्हा संधी मिळणार असल्याचेसांगितले जात आहे. अलीकडेच डिजलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या खाली लिहिलेल्या ओळींमध्ये शेवटी त्याने दीपिकाच्या नावालाही हॅशटॅग केले आहे.