पुणे – विशेष शाखेत असलेले सहायक पोलिस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध सातारा येथे खंडणीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबतचा अहवाल सातारा पोलिसांकडून आल्यावर तो पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी बुधवारी दिली.
हुंबरे यांच्याविरुद्ध ४० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील भुईज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंबरे यांच्या विरोधात असलेल्या अनेक तक्रारींमुळे त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मात्र सक्तीच्या रजेवर असताना देखील गणवेश घालून त्यांनी आरोपींला अटक न करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती