नवी दिल्ली – चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू क्रिकेटपटू दीपक चाहर दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दुखापतीमुळे खेळू शकणार नसला तरीही त्याचे आर्थिक नुकसान होणार नसल्याने त्याला दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयने 2011 साली तयार केलेल्या एका विमा संरक्षणाच्या तसेच नुकसान भरपाईच्या नियमामुळे त्याला दिलासा मिळाला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या लिलावात चहरला 14 कोटींची मोठी बोली लावून चेन्नईने आपल्या संघात घेतले होते. तो चेन्नईकडून एकही सामना दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. मात्र, तो स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याला बोली लागलेली 14 कोटींची रक्कम मिळणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, चहरला बीसीसीआयने 2011 साली घतलेल्या एका निर्णयाचा फायदा होणार आहे. चहरला 14 कोटी मिळणार नसले तरी त्याला करारातूल रकमेबाबत नियमाचा लाभ होणार आहे. बीसीसीआने 2021-22 सालच्या मोसमात चहरला केंद्रीय करारात सामील करून घेतले. यामुळेच आयपीएलमध्ये त्याला मिळालेली रक्कम दुखापतीमुळे बाहेर रहावे लागल्यानंतरही मिळणार आहे.
असा आहे नियम…
आयपीएलमध्ये बीसीसीआयने 2011 साली एक नवा नियम तयार केला. याअंतर्गत बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील कोणताही खेळाडू दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळू शकला नाही. तर त्या खेळाडूला लिलावात मिळालेली रक्कम विमा कंपनीद्वारे मिळते. बीसीसीआय आपल्या केंद्रीय करारातील सर्व खेळाडूंचा वीमा काढते. त्यात एखादा खेळाडू दुखापतीमुळे त्या सत्राला मुकला तर बीसीसीआय त्या खेळाडूला वीमाद्वारे त्याची रक्कम देते. नियमानुसार करार झालेला खेळाडूची अर्धी रक्कम बीसीसीआय आणि अर्धी रक्कम त्याला खरेदी केला संघ देइल.