#IPL2019 : सर्वाधीक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम चहरच्या नावे

चेन्नई – चेन्नई सुपर किंग्जचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात तब्बल 20 चेंडू निर्धाव टाकत आयपीएलमधील एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम सनरायजर्स हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज अंकित राजपूत यांच्या नावावर होता. त्यांनी प्रत्येकी 18 चेंडू निर्धाव टाकले होते.

यावेळी, सामन्यानंतर बोलताना दीपक चहरने चेन्नईला अधिक चांगली खेळपट्टी अपेक्षित असल्याचे सांगितले. तो पुढे म्हणाला की, मी चांगली गोलंदाजी केल्याचा आनंद नक्कीच आहे, मात्र अशी खेळपट्टी कुणालाच नको असते. चेन्नईतील हवामान खूप गरम असून क्‍युरेटर त्यांच्यापरीने खेळपट्टी चांगली करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात,” असेही चहरने नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.