दुबई : यंदाच्या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंचा गौरव करण्यासाठी आयसीसीने बुधवारी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये भारताच्या रोहित शर्माला ‘आयसीसी वनडे प्लेयर आॅफ द ईयर’, विराटला ‘ स्पिरिट आॅफ क्रिकेट’ आणि वेगवान गोलंदाज दीपक चहरला ‘ सर्वोत्तम टी-२० परफाॅर्मन्स आॅफ द ईयर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
Deepak Chahar's 6/7 against Bangladesh in November are the best figures in the history of men's T20I cricket.
That spell is the T20I Performance of the Year.#ICCAwards pic.twitter.com/QJoXY3OuyQ
— ICC (@ICC) January 15, 2020
दरम्यान , दिपक चहरने नोव्हेंबर २०१९मध्ये बांगलादेशविरुद्धच्या तिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ गोलंदाजी केली होती. त्यानं ३.२ षटकांत अवघ्या ७ धावा दिल्या आणि ६ विकेट घेतल्या होत्या. ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली होती. यासाठीच आयसीसीने दीपक चहरची ‘सर्वोत्तम टी-२० परफाॅर्मन्स आॅफ द ईयर’ पुरस्कारासाठी निवड केली आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा अजंता मेंडिस यांच्या नावावर होता. त्यानं २०१२ मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध ८ धावा देऊन सहा विकेट घेतल्या होत्या.
तसेच याच सामन्यात त्याने हॅट्ट्रिक केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. चहरनं सामन्यात डावाच्या १८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शफीउल इस्लाम याला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. डावाचे अखेरचं षटकही त्यानं टाकलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुस्तफिजुर रहमान याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. त्यानंतर अमिनुल इस्लामला त्रिफळाचित केलं. याचबरोबर त्यानं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला.