दिल्लीतील हिंसाचारामागे दीप सिद्धूचा हात; शेतकरी नेत्यांचा आरोप

नवी दिल्ली – कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या धरून बसले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले.  अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या हिंसाचाराला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू जबाबदार असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी केला आहे.

गुरनाम सिंह चढूनी यांनी दीप सिद्धूपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. दीप सिद्धू आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत होता. दीप सिद्धू नेहमीच शेतकरी नेत्याविरुद्ध वक्तव्य करतो. शेतकऱ्यांची दिशाभूल करतो.

तसेच, मंगळवारी झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. आमचे लाल किल्ल्यावर जाण्याचे कोणतेही नियोजन नव्हते, असे स्पष्टीकरण त्यांनी एका व्हिडिओत दिले आहे.

शेतकरी नेते राजिंदर सिंह यांनी दिल्लीच्या हिंसाचाराला केंद्रीय एजन्सी दोषी असल्याचा दावा केला आहे.

शेतकरी संघटनेचे नेते बलबीरसिंग राजेवाल म्हणाले की, आपण शांततेत राहिल्यास नक्कीच जिंकू असे मी आधीच सांगितले होते. परंतु, आपण हिंसेच्या मार्गावर गेल्यास आपण जिंकू शकत नाही. आता ज्या लोकांनी शेतकऱ्यांना चुकीच्या मार्गावर नेले आहे, ते सर्व यास जबाबदार आहेत. ते का आणि कसे घडले याचा आत्मपरीक्षण करू, असे शेतकरी युनियनचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.