कोल्हापूर : पालकमंत्र्यांच्या हस्ते 5 रूग्णवाहिकांचे लोकार्पण

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रासाठी 3 आणि 2 ग्रामीण क्षेत्रासाठी अशा एकूण 5 रूग्णवाहिकांचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या स्थानिक निधीतून 3, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्थानिक निधीतून 1 आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या स्थानिक निधीतून 1 अशा रूग्ण वाहिकांचा समावेश आहे.

आमदार श्री. जाधव आणि आमदार श्री पाटील यांनी यावेळी प्रतिकात्मक चावी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रदान केली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपमहापौर संजय मो‍हिते, नगरसेवक दिलिप पोवार, महिला व बालकल्याण सभापती शोभा कवाळे, प्रभाग समिती सभापती रिना कांबळे, आशपाक आजरेकर, सुनील पाटील उपस्थित होते.

घाटगे पाटील ग्रुपच्यावतीने कोव्हिड-19 साठी शववाहिका देण्यात आली. यावेळी तेज घाटगे, अमोल नेर्ले उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.