कंपन्यांच्या उत्पादनावर होत आहे घट 

सियाम; 8 दिवसांपासून सुरू असलेला ट्रकचालकांचा संप मिटविण्याची गरज

नयी दिल्ली: वाहतूकदारांचा संप सुरू होऊन आता 8 दिवस झाले आहे. मात्र, तो सुटावा यासाठी गंभीर प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी औद्योगिक उत्पादन घटण्याबरोबरच महागाई वाढू शकते, असे उद्योजकांच्या संघटनांना वाटत आहे.

या संपामुळे वाहन उद्योगांवर परिणाम होत आहे. वाहन कंपन्यांचे सुटे भाग वेळीच उपलब्ध होण्याची गरज असते. मात्र, संपामुळे सुट्या भागाची वाहतूक थंडावली आहे. त्यामुळे कंपन्यांना उत्पादनाला मर्यादा घालाव्या लागत आहेत. आगामी काळात संप मिटला नाही तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सियामने म्हटले आहे. टाटा मोटर्स, फोर्ड इंडिया, स्कोडा इंडिया या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. या कंपन्यांच्या उत्पादनाबरोबरच तयार वाहने पाठविण्याच्या कामावरही परिणाम झाला आहे.
शारुख खान, कार्यकारी संचालक, डाबर इंडिया
संप सुरू होण्याची शक्‍यता असल्यामुळे आम्ही बऱ्याच प्रमाणात कच्च्या मालाची साठवणूक केली होती. त्यामुळे आतापर्यंत तरी आमच्या उत्पादनावर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, जर संप आणखी काही काळ चालला तर आमच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन हा संप मिटविण्याची गरज आहे.
सियामचे उपमहासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले की, आमच्या सदस्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. लवकरच उत्सवांचा हंगाम सुरू होणार आहे. या काळात वाहन विक्री वाढते. त्यासाठी कंपन्या उत्त्त्पादन वाढवितात. मात्र, आता संप सुरू असल्यामुळे त्यांना नियमित उत्पादन घेणेही अवघड झाले असल्याचे दिसून येत आहे.
ते म्हणाले की, सुट्या भागाचा एक तर पुरवठा होत नाही किंवा रस्त्यावर माल थांबलेला आहे. त्यामुळे उत्पादनाची एकूणच शृंखला थंडावली आहे. त्याचा या कंपन्यांना काही महिने परिणाम भोगावा लागणार आहे. त्याचबरोबर याचा निर्यातीवरही परिणाम झाला आहे. वेळेवर परदेशात वाहने पाठविणे अशक्‍य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
एआयएमटीसी या ट्रकचालकांच्या संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आठ दिवसापूर्वी संप सुरू केला आहे. या संघटनेत 93 लाख इतके ट्रकचालक असल्याचे सांगितले जाते. डिझेलवरील राज्याचे आणि केंद्र सरकारचे कर कमी करावेत. त्याचबरोबर डिझेलचा जीएसटीत समावेश करावा, या व इतर मागण्यांसाठी ट्रकचालकांनी संप सुरू केले आहे. विविध राज्यांत विविध कर असल्यामुळे त्या राज्यातील वाहतुकीचा खर्च वेगळा असतो. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर वाहतूक करताना त्यांना हिशेबासाठी त्रास होतो असे ट्रकचालकांचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)