दर कपात व सवलतीनंतरही घरांच्या विक्रीत घट 

मुंबई: पुण्यात निवासी क्षेत्रातील लॉंचेसचे प्रमाण 2017 मधील पहिल्या सहामाहीतील नीचांकावरून 2018 मधील पहिल्या सहामाहीत वार्षिक 78% वाढले. या तिमाहीत लहान घराच्या विक्रीला चालना मिळाली आणि त्या श्रेणीमध्ये लॉंचेसे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर पुणे शहरात सरासरी युनिट आकारामध्ये 2013 पासून 2018 पर्यंत 23% घट झाली आहे. या काळात किमतींमधील घट कायम राहीली असून वार्षिक पातळीवर 5% घट झाली आहे.

नाईट फ्रॅंक इंडियाने इंडिया रिअल इस्टेट ही अर्धवार्षिक अहवालाची नववी आवृत्ती जाहीर केली असून या अहवालामध्ये, जानेवारी – जून 2018 (2018 मधील पहिली सहामाही) या कालावधीतील पुण्यातील निवासी व ऑफिस मार्केटच्या कामगिरीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

किमतीत घट होण्याबरोबरच, अन्यही काही अप्रत्यक्ष सवलती जाहीर होत आहेत. त्यात लवचिक वित्तपुरवठा, जीएसटी/स्टॅम्प ड्युटी माफ, भेटवस्तू, मोफत उपकरणे, इ.चा समावेश आहे. 2018 मधील पहिल्या सहामाहीत विक्रीत वार्षिक 6% घट झाली आहे. नियमनात्मक सवलती व विकसकांकडून सवलती विक्री वाढवण्यासाठी असमर्थ ठरल्या आहेत. बहुतांश विक्री ओसी रेडी प्रकल्पांमध्ये होत असल्याचे दिसून आले. विक्री न झालेल्या इन्व्हेंटरीमध्ये वार्षिक घट 32% इतकी झाली आहे.

2014 मधील दुसऱ्या सहामाहीपासून 2018 तील पहिल्या सहामाहीपर्यंतचर हर आकडेवारी आहे.
पुण्यात ऑफिस क्षेत्र नव्या ऑफिसचा पुरवठा वार्षिक 54% अधिक होता, परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठ्याची गती कमी होती. पुणे ऑफिस मार्केट अधिक सक्षम होते, कारण 2018 मधील पहिल्या सहामाहीत ऑफिस लीजिंगच्या बाबतीत तब्बल 118% वाढ नोंदवण्यात आली. ऑक्‍युपायर्सनी बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांतील अगोदर केलेल्या नियोजनाच्या मदतीने जागेच्या कमतरतेवर मात केल्याचे दिसून आले. या काळात बीएफएसआयकडून मोठी मागणी होत असल्याचे दिसून आले. तर रिकाम्या राहण्याचे प्रमाण 5.7% इतके आहे. पुण्यातील वेटेड ऍव्हरेज रेंटलमध्ये वार्षिक 8% वाढ झाली आहे.

आयटी क्षेत्राकडून असलेली मागणी 2017 मधील पहिल्या सहामाहीतील 60% वरून 2018 तील पहिल्या सहामाहीत 30% पर्यंत घटली असली तरी बीएफएसआय क्षेत्राचा हिस्सा तिपटीहून अधिक वाढला आहे.

निष्कर्षांविषयी बोलताना, पुण्याचे ब्रॅंच डायरेक्‍टर परमवीर सिंग पॉल यांनी सांगितले की, पुण्यातील ऑफिस मार्केटमध्ये मोठी क्षमता आहे. भाड्यामध्ये आणखी वाढ होऊनही, 2018 मधील पहिल्या सहामाहीत व्यवहारांमध्ये वार्षिक 118% वाढ झाली. अनेक वर्षे, मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने पुण्यातील ऑफिस मार्केटमध्ये ऑफिससाठी जागेची टंचाई आहे.

2018 मधील पहिल्या सहामाहीत, पुण्यातील निवासी बाजारात लॉंचेसमध्ये वार्षिक 78% इतकी लक्षणीय वाढ झाली. परंतु, ही वाढ, तसेच किमतीतील घट, अप्रत्यक्ष सवलती, सरकारकडून सवलती व धोरणातील सुधारणा विक्रीमध्ये वाढ करू शकल्या नाहीत. ग्राहक खरेदीच्या दृष्टीने, बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांचा किंवा वापरण्यासाठी सज्ज असलेल्या प्रकल्पांचा विचार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)