नवी दिल्ली – दिल्लीमध्ये दारू पिण्याचे कायदेशीर वय 25 वर्षांवरून 21 वर्ष करण्यात आले आहे. यासह दिल्ली सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली सरकार कोणत्याही नवीन दारूच्या दुकानांना मान्यता देणार नाही.
नवीन उत्पादन शुल्क धोरण जारी करताना हे निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, हे निर्णय दिल्लीच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाचा भाग आहेत.
दिल्लीच्या अबकारी धोरणात केजरीवाल सरकारने आणखी बरेच महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. अल्पवयीन मद्यपानाविरुद्ध मोहीम राबवित असताना सरकारने दारू पिण्याचे कायदेशीर वय 21 वर्षे पर्यंत कमी केले. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणेच आता दिल्लीत दारू पिण्याचे कायदेशीर वय 21 वर्षे होईल.
मनीष सिसोदियांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, दारूच्या दुकानांसाठी नवीन नियम जाहीर केले जातील. दारूची तस्करी रोखण्याची योजना आहे. उत्पादन शुल्कात 20% वाढ होईल म्हणजे 1 ते 1000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
याद्वारे बनावट दारू रोखण्यासाठी दिल्लीत प्रथम आंतरराष्ट्रीय दर्जाची तपासणी प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहे, याचीही घोषणा केली गेली आहे.