मुंबई – एकूणच जागतिक पातळीवर नकारात्मक परिस्थिती असल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी बुधवारी नफा काढून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांत एक टक्क्यापर्यंत घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 537 अंकांनी कमी होऊन 56,819 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीे 162 अंकांनी कमी होऊन 17,038 अंकांवरवर बंद झाला.
बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बॅंक, डॉक्टर रेड्डीज, स्टेट बॅंक, इन्फोसिस, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर टाटा स्टील, एशियन पेंट्स, एचसीएल टेक्नॉलॉजी, टीसीएस, कोटक बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळेही शेअर बाजारात विक्रीचे वातावरण होते. परदेशी गुंतवणूकदारांनी काल 1,174 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची माहिती शेअर बाजारांनी जारी केली.