पुणे – गौरी विसर्जनानंतर फुलांना मागणी घटली आहे. त्या तुलनेत आवक जास्त होत आहे. परिणामी, मार्केट यार्डातील फुल बाजारात झेंडूच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 50 टक्क्यांनी घट झाली. तर, उर्वरित फुलांच्या भावात 30 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव : झेंडू : 40-60, गुलछडी : 80-160, अष्टर : जुडी 20-40, सुट्टा 1-18, कापरी : 40-80, शेवंती : 40-80, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 20-40, गुलछडी काडी : 20-50, डच गुलाब (20 नग) : 60-120, लिलिबंडल : 25-35, जर्बेरा : 10-30.