मुंबई – गेल्या पाच दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी वाढून विक्रमी पातळीवर गेले होते. निर्देशांकांना आणखी वाढण्यास वाव कमी असल्याची भावना निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी गुरुवारी नफेखोरी केली. त्यामुळे पाच दिवसानंतर शेअर बाजार निर्देशांकात ( stock market news today ) घट नोंदली गेली.
एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसह आयसीआयसीआय बॅंक या बड्या कंपन्यांच्या शेअरची नफ्यासाठी विक्री झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा, इंडसइंड बॅंक, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांनाही नफेखोरीचा फटका बसला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ( bombay stock market news ) सेन्सेक्स ( sensex today ) 143 अंकांनी म्हणजे 1.31 टक्क्यांनी कमी होऊन 45,959 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ( national stock exchange ) निफ्टी ( nse nifty ) 50 अकानी कमी होऊन 13,478 अंकांवर बंद झाला.
आजच्या विक्रीच्या वातावरणातही नेस्ले, आयटीसी, कोटक बॅंकेच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. या घटनाक्रमाचे बद्दल आनंद राठी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे नफेखोरी होणे अपेक्षित होते. निर्देशांक जास्त प्रमाणात कमी झाले असते मात्र आशियाई विकास बॅंकेने यावर्षी भारताचा विकास जर उणे 9 नाही तर उणे 8 टक्के होणार असल्याचे म्हटले. त्याचबरोबर पुढील वर्षाचा विकास दर 8 टक्के होणार असल्याचे बॅंकेने सांगितल्यामुळे नफेखोरी मर्यादित प्रमाणात झाली.
जागतिक बाजारातूनही आज नकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. दरम्यान क्रुडचे भाव 0.76 टक्क्यांनी वाढून 49.23 डॉलर प्रति पिंप झाले. तर रुपयाचा भाव आज 9 पैशांनी कमी होऊन प्रति डॉलरला 73 रुपये 66 पैसे झाला.