कार कंपन्यांकडून उत्पादनात घट

नवी दिल्ली- लॉकडाऊननंतर कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रिया थंडावल्या होत्या. त्याचा या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. प्राप्त माहितीनुसार मे महिन्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीचे केवळ 2 टक्के उत्पादन झाले.

कमी-अधिक प्रमाणात इतर कंपन्यांची हीच परिस्थिती आहे. मे महिन्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीने केवळ 3,714 कार तयार केल्या. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये या कंपनीने 1,51,188 कार तयार केल्या होत्या. मात्र आता कंपनीच्या सर्व प्रकल्पामध्ये उत्पादन प्रक्रिया काही प्रमाणात सुरू झाली आहे. या प्रकियेला लवकरच वेग येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.