मुंबई – तीन फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 1.4 अब्ज डॉलरने कमी होऊन 575 अब्ज डॉलर झाला आहे. त्या अगोदरच्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा तीन अब्ज डॉलरने वाढला होता.
केंद्र सरकार आणि रिझर्व बॅंक परकीय चलनाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये भारताकडील परकीय चलन साठा 645 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेल्यानंतर या साठ्यामध्ये काही प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे. रशिया- युक्रेन युद्ध आणि अमेरिकेत होत असलेल्या व्याजदरवाढीमुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतातील गुंतवणूक परवडत नसल्यामुळे हे गुंतवणूकदार परत जात आहेत.
अशा परिस्थितीत निर्यात वाढविण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे. अनिवासी भारतीयांनी जास्तीत जास्त रक्कम डॉलरच्या स्वरूपात भारतात पाठवावी यासाठी आवाहन करण्यात आले आहे. अनेक देशाबरोबर डॉलरऐवजी रुपयाच्या माध्यमातून व्यापार वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.