#GoldRate | सोने-चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसात सोन्याचे दर बरेच वाढल्यामुळे आता काही गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात घट नोंदली गेली
दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 97 रुपयांनी कमी होऊन 47,853 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,417 रुपयांनी कमी होऊ 71,815 रुपये प्रति किलो झाला.

जागतिक बाजारातही सोन्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,867 डॉलर तर चांदीचा दर 27.88 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला.

या घटनाक्रमाला बाबत रिलायन्स सिक्‍युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सध्या सोन्याचे दर जास्त पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार सावध झाले आहेत. त्याचबरोबर करोनाच्या अनुषंगाने एकूण जागतिक परिस्थिती लवचिक आहे.

त्यामुळे आगामी काळात गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदार सावध राहून निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. बऱ्याच गुंतवणूकदारांना आता सोन्याचे दर सध्याच्या पातळीपेक्षा जास्त वाढणार नाहीत असे वाटत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.