नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढूनही दिल्ली सराफात मात्र सोन्याचा दर 760 रुपयांनी कमी होऊन 51,304 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,276 रुपयाने कमी होऊन 56,930 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,770 डॉलर व चांदीचा दर 19.94 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. महागाई आणि रशिया- युक्रेन युद्धामुळे सोने- चांदी बाजारासह विविध बाजारात अस्थिरता कायम आहे असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. मात्र जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे आगामी काळामध्ये सोन्याचे दर काही प्रमाणात वाढू शकतात.