मागणी असूनही कोळशाच्या आयातीत घट

नवी दिल्ली  – देशातील अनेक वीज उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना कोळशाची तीव्र टंचाई जाणवत असताना आणि कोळशाची मागणी वाढत असतानाही ऑगस्ट महिन्यात कोळसा आयातीत 2.7 टक्के घट झाल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

ऑगस्ट महिन्यात 15.22 दशलक्ष टन कोळसा आयात झाला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 15.64 दशलक्ष टन कोळसा आयात करण्यात आला होता.

तथापि, या क्षेत्रातील अधिकारी विनय वर्मा यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात कोळसा आयात कमी झाली असली तरी येत्या काही काळात ही आयात आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे भाव वाढते असल्याने आयातीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.