नोकर भरतीची घोषणा खोटी : पी. चिदंबरम

file photo....

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे सेवेमध्ये येत्या दोन वर्षांमध्ये एकूण चार लाख पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली. पियुष गोयल यांनी केलेली ही नोकरभरतीची घोषणा म्हणजे आणखी एक जुमला असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.

रेल्वेमध्ये जवळपास पाच वर्षांपासून 2,82,976 पदे रिक्त आहेत. सरकार आता अचानक झोपेतून जागे झाले आहे. तीन महिन्यांमध्ये या रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. एकीकडे सरकारी विभागांमध्ये मोठया प्रमाणात पदे रिक्त आहेत आणि दुसरीकडे तरुणवर्ग बेरोजगार आहे, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/PChidambaram_IN/status/1088336310345945090

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)