‘पीएम मोदी’ चित्रपट पाहूनच आयोगाने बंदी आणावी की नाही हे ठरवावे – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाला निवडणूक आयोगाने दिलेल्या स्थगितीनंतर चित्रपट निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट पाहावा आणि त्यानंतर निर्णय द्यावा, असा आदेश निवडणूक आयोगाला दिला आहे.

याआधी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक होईपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचे सांगितले होते. त्यानंतर चित्रपट निर्मात्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाला आदेश देत, चित्रपटावर बंदी आणावी की नाही हे आयोगाने चित्रपट पाहूनच ठरवावे, असे सांगत हा चित्रपट पाहून २२ एप्रिल पर्यंत सीलबंद लिफाफ्यात अहवाल कळविण्यास सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.