पुण्यात जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

पुणे – शहरासह ग्रामीण भागात करोनाची वाढती रुग्ण संख्या विचारात घेता शिवाजीनगर येथील सीओईपीच्या ग्राऊंडवर उभारलेले जम्बो हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या शुक्रवारच्या बैठकीत होणार होता. मात्र, अधिवेशन सुरू असल्याने हा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

 

 

करोनाची संख्या कमी झाल्यानंतर दि. 1 जानेवारी 2021 पासून जम्बो हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड रिक्त होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. जर रुग्ण संख्या वाढली तर सात दिवसांच्या आत पुन्हा जम्बो हॉस्पिटल सुरू करण्यात येईल, अशी प्रशासनाची तयारी आहे.

 

 

मागील तीन महिन्यांपासून जम्बो हॉस्पिटल बंद आहे. त्यामुळे ते सुरू करायचे झाल्यास त्याचे स्ट्रकचल ऑडिट केले जाणार आहे. जेणेकरून जम्बो हॉस्पिटलची भक्कमता तसेच येणारा उन्हाळा तसेच जोरदार वाऱ्याचा विचार करता त्याची क्षमता तपासली जाणार आहे.

 

 

दर महिन्याला चार ते साडेचार कोटी रुपये खर्च

जम्बो हॉस्पिटलमध्ये मशीन, इतर आरोग्य उपकरणे तशीच आहे. कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध असताना तात्पुरती उभारलेल्या हॉस्पिटलवर खर्च का करायचा या हेतूने जम्बो हॉस्पिटल बंद केले होते. आता ते सुरू केले तर दर महिन्याला चार ते साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.