ऐतहासिक निर्णय….वादग्रस्त जागा हिंदूंची – सर्वोच्च न्यायालय

मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी जागा देणार – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : देशात मागील अनेक दशकांपासून संवेदनशील असणाऱ्या अयोध्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही हिंदुंची असल्याचे सांगत ही जागा हिंदूंना देण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर अयोध्येतच पर्यायी 5 एकर जागा मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश रंजन गोगाई यांच्यासह पाच न्यायाधिशांच्या पीठाने आज अयोध्या प्रकरणावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ निकाल देत दिला. न्यायालयाने राम मंदिर आणि बाबरी मशीद वादात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सलग 40 दिवसांच्या सुनावणीत दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने जागा तीन अर्जदारांमध्ये विभागण्याची चूक केली असल्याचे सांगत न्यायालयाने वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येईल असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. तर मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येजच वेगळी जमीन देण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, निर्णय देत असताना न्यायालयाने केंद्र सरकारने तीन महिन्यात मंदीर उभारणीची योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राम मंदिर बांधण्यासाठी सरकारला ट्रस्ट स्थापण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बनवण्यासाठी 5 एकर जागा दिली जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.