kutimb

सातारा : ग्रामपंचायत कारभारी निवडीचा फैसला आज

जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्या याचिका? आदेश निघण्याची शक्‍यता

सातारा , प्रतिनिधी : फलटण, कराड, जावली, माण आणि पाटण या पाच तालुक्‍यांमध्ये रखडलेल्या सरपंच व उपसरपंच निवडीकडे स्थानिक जनतेचे डोळे लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या तालुक्‍यांतून सरपंच आरक्षण सोडतीविरोधात दाखल झालेल्या याचिका फेटाळून लावल्याने या तालुक्‍यात तहसीलदार अधिकारी नेमून लवकरच सरपंच, उपसरपंच निवडीची सभा लावणार आहेत.

सरपंच आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने दाखल झालेल्या याचिकांपैकी खटाव तालुक्‍यातील सातेवाडी वगळता इतर याचिका जिल्हाधिकाऱ्यानी फेटाळल्या आहेत. आता फलटण, जावली, माण, कराड आणि पाटण या पाच तालुक्‍यांतील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

खटाव तालुक्‍यातील सातेवाडी, फलटण तालुक्‍यातील जावली, अलगुडेवाडी, कुरवली बुद्रूक, माण तालुक्‍यातील पिंगळी बुद्रूक, वारुगड, धामणी, जाशी, कजहाड तालुक्‍यातील पोतले, वराडे, पाटण तालुक्‍यातील घाटेवाडी ग्रामपंचायतींमधून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरपंच आरक्षण सोडतीबाबत दाखल झालेल्या याचिकांच्या अनुषंगाने सहा तालुक्‍यांतील 11 तक्रारींवर मंगळवारी (दि. 9 फेब्रुवारी) जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत सातेवाडी वगळता दाखल झालेल्या इतर ग्रामपंचायतींच्या याचिका जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्या.

दरम्यान, जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच झालेली आहे. मात्र, सरपंच आरक्षण सोडतीबाबत तक्रारी दाखल असलेल्या पाच तालुक्‍यांतील सरपंच-उपसरपंच निवडीला न्यायालयाने स्थगिती दिली होती. या स्थगितीची मुदत मंगळवारी संपली. आता खटाव तालुका वगळता फलटण, कराड, जावली, माण आणि पाटण तालुक्‍यांतील सरपंच-उपसरपंच निवडीसाठी सभा घेण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.