डोर्लेवाडी, झारगडवाडीकरांचा निवडणुकीवर बहिष्कार

मूलभूत सुविधा मिळत नसल्याने घेतला निर्णय

डोर्लेवाडी – बारामती तालुक्‍यातील डोर्लेवाडी व झारगडवाडी येथे मुलभूत सुविधा मिळत नसल्याने विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

डोर्लेवाडी येथे मुस्लीम, लिंगायत, लोहार, सुतार, जैन ,कोष्टी, वडारी अशा अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडच्या काळात मात्र नागरिकांच्या मुलभूत सुविधांच्या प्रश्‍नांकडे कोणीही लक्ष देत नसल्यने लक्ष देत गावामध्ये नाराजी वाढली आहे. येथील मुस्लीम समाजाच्या दफनभूमी व मश्‍जीद परिसरातील सुशोभीकरणाचा अनेक वर्षांचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. लिंगायत समाज दफनभूमीची 100 वर्षांपूर्वीची वहिवाट असूनही याठिकाणी जाण्यास रस्ता नाही.

गावातील जैन, कोष्टी, सुतार, लोहार समाजालाही मूलभूत विकासापासून वंचित असल्याने नाराजीचे वातावरण आहे. येथील विकासकामांसाठी कोणताही निधी आजपर्यंत उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्‍त करीत आहे.

यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याबाबतचे निवेदन डोर्लेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास तर झारगडवाडी ग्रामस्थांनी तहसीलदरांना निवेदन दिले आहे. दरम्यान, झारगडवाडीतील ज्योतीबानगर येथील झारगड वस्ती, निकम वस्ती, बिचकुले वस्ती ते दरेकर पाणंद जोड रस्त्याचे मंजूर काम स्थानिक शेतकरी यांनी मालकी हक्‍क दाखवत बंद पाडले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)