तक्रारींवर 3 डिसेंबरपर्यंत निर्णय

अंतिम वर्ष निकाल : 3 हजार 500 तक्रारी दाखल

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष परीक्षांच्या निकालाबाबत 3 हजार 500 तक्रारी दाखल आल्या आहेत. याबाबत 3 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय होणार असून त्यानंतर सुधारित निकाल जाहीर होणार आहे.

विद्यापीठाकडून 12 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन व ऑफलाइनद्वारे अंतिम वर्ष परीक्षा घेतल्या.

यात तांत्रिकसह इतर अडचणींचा सामना करत व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मार्ग काढत परीक्षा घेण्यात आल्या. यातील बहुतांश परीक्षांचे निकालही जाहीर झाले.

निकालासंदर्भात परीक्षा विभागाकडे विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांचे विश्‍लेषण आणि तथ्यता पडताळून त्याचे निवारण करण्यासाठी परीक्षा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.