मेलबर्न – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबत आयसीसीने निर्णय घ्यायला पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर याने व्यक्त केले आहे.
आयसीसीवर बीसीसीआयचा दबाव असल्याचे सिद्ध होत आहे. आयपीएल खेळविण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचेही दिसून येते. आता आयसीसी त्यांच्या स्पर्धेबाबत गंभीर आहे का असा प्रश्न निर्माण झाला असून लवकरात लवकर या स्पर्धेबाबत सर्व काही स्पष्ट व्हावे. क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाची स्पर्धा घ्यायची का आयपीएल हे देखील स्पष्ट करावे, असेही टेलर म्हणाले.