पुणे: सोलारिस आंतर क्लब टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत डायमंड्स, डेक्कन चार्जर्स, डेक्कन वॉरियर्स आणि पीसीएलटीए या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन वॉरियर्स संघाने डेक्कन अवेंजर्सचा 19-09 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. डेक्कन वॉरियर्सकडून नितीन भावे, अजय जाधव, संजय कामत, अमोद वाकणकर, अमित सुमंत, सिद्धार्थ देसाई यांनी अफलातून कामगिरी बजावली.
सविस्तर निकाल – उपांत्यपूर्व फेरी – डायमंड्स वि.वि. टेनिस टायगर्स 21-15. (हनिफ मेमन/अनुप मिंडा वि.वि. संतोष जयभाय/जितेंद्र जोशी 6-2; अमित नाटेकर/अमित लाखे पराभूत वि. तारख पारीख/केतन जाठर 3-6; ध्रुव मेड/अभिषेक ताम्हाणे वि.वि. केदार पाठक/बाबू जाधव 6-5 (11-9); अनुप मिंडा/केदार देशपांडे वि.वि. जितेंद्र जोशी/शिवाजी यादव 6-2); डेक्कन चार्जर्स वि.वि. महाराष्ट्र मंडळ 20-09 (आशिष पुंगलिया/नितीन जोशी वि.वि. रवी कोठारी/अनिल कोठारी 6-2; अजय कामत/मदन गोखले वि.वि. संजय सेठी/अर्पित श्रॉफ 6-0; नितीन जोशी/मिहीर केळकर पराभूत वि. अभिषेक चव्हाण/रवी कोठारी 2-6; मुकुंद जोशी/ऋषिकेश पाटसकर वि.वि. कमलेश शहा/आर देशमुख 6-1);
डेक्कन वॉरियर्स वि.वि. डेक्कन अवेंजर्स 19-09 (नितीन भावे/अजय जाधव वि.वि. पद्माकर कर्वे/विजय गोखले 6-0; संजय कामत/अमोद वाकणकर वि.वि. आलोक गोळे/अमूल बापट 6-0; अमित पाटणकर/नितीन भावे पराभूत वि. विजय गोखले/सचिन आराध्ये 1-6; अमित सुमंत/सिद्धार्थ देसाई वि.वि. केदार जोगळेकर/राजीव पागे 6-3); पीसीएलटीए वि.वि. एमडब्लूटीए अ 20-18 (राजेश मित्तल/निर्मल वाधवानी पराभूत वि. सुनील लुल्ला/मनोज हार्डीकर 4-6; रवी जौकनी/गिरीश कुलकर्णी पराभूत वि. गजानन कुलकर्णी/मंदार वाकणकर 4-6; नंदू रोकडे/विशाल साळवी वि.वि. राजेश मंकणी/सुनील लुल्ला 6-1; जॉय बॅनर्जी/अनंत गुप्ता वि.वि. विवेक खडगे/सुमंत पॉल 6-5(7-5).