पुणे – पुणे- मुंबई दरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या डेक्कन क्वीनला मंगळवारी 91 वर्षे पूर्ण झाली. तर पंजाब एक्स्प्रेसला 110 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने डेक्कन क्वीन आणि पंजाब एक्स्प्रेसचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा, पुणे स्टेशनचे संचालक सुरेशचंद्र जैन यांसह रेल्वेचे अधिकारी आणि प्रवासी संघाचे सदस्य उपस्थित होते. मागील 67 वर्षांपासून दरवर्षी डेक्कन क्वीनचा थाटात वाढदिवस साजरा करण्यात येतो. मात्र करोनामुळे सलग दोन वर्षे वाढदिवशी रेल्वे यार्डातच उभी आहे.