डेक्‍कन क्‍वीन, इंद्रायणी, सिंहगड आजपासून सुरळीत

पुणे -मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्या सोमवारपासून नियोजित वेळेनुसार धावणार आहेत. यात डेक्‍कन क्‍वीन, इंद्रायणी, सिंहगडसह इंटरसिटी एक्‍स्प्रेस नियोजित वेळेनुसार धावणार आहेत.

पुणे-मुंबई चाकरमान्यांसाठी महत्त्वाची असणारी पुणे-मुंबई डेक्कन क्‍वीन ही सोमवारी सकाळी आपल्या नियोजित वेळेनुसार सुटेल. तर, प्रगती एक्‍स्प्रेसची पुणे-मुंबई फेरी सोमवारी होणार नसून ती फक्‍त मुंबईहून सुटणार आहे. सोबतच मुंबई-चेन्नई, मुंबई-कन्याकुमारी या दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या पनवेल-कर्जतमार्गे पुण्याकडे येणार आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.