पुणे – ठाणे आणि कळवा या धीम्या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामासठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि.8 आणि 9 जानेवारी रोजी सुटणारी डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेकडून 8 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 10 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 8 आणि 9 जानेवारी रोजी सुटणाऱ्या मुंबई -पुणे -मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई – गदग एक्स्प्रेस यांसह अन्य ट्रेन्स रद्द आहेत.
या ट्रेन्सच्या मार्गात अंशत: बदल
हुबळी-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. तर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहे.