डेक्कन जिमखाना व पूना क्‍लब उपांत्य फेरीत

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3 दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीत तिसऱ्या दिवशी तुषार श्रीवास्तव (नाबाद 261) याने केलेल्या धडाकेबाज द्विशतकी खेळीसह दिग्विजय देशमुख (25-2), प्रखन अगरवाल (15-2), स्वप्निल गुगळे (19-2), मुकेश (29-2), आत्मन पोरे (22-1) यांनी केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावाच्या अधिक्‍याच्या जोरावर पूना क्‍लबविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला., तर संग्राम अतितकर(160धावा)याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर पूना क्‍लब संघाने पहिल्या डावाच्या अधिक्‍याच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवशी केडन्स संघाचा डाव 31 षटकात 4 बाद 101 धावापासून पुढे सुरु झाला. तत्पूर्वी पहिल्या दिवशी डेक्कन जिमखाना 133 षटकात 7 बाद 520 धावा केल्या होत्या. याच्या उत्तरात केडन्स संघ पहिल्या डावात 60.2 षटकात 175 धावावर संपुष्टात आला. यात चिराग खुराना 73, अक्षय वाईकर 35, अजित गव्हाणे 18 यांनी धावा केल्या. डेक्कन जिमखानाकडून दिग्विजय देशमुख (25-2), प्रखन अगरवाल (15-2), स्वप्निल गुगळे (19-2), मुकेश (29-2), आत्मन पोरे (22-1) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत केडन्सला पहिल्या डावात 175 धावांवर रोखले. त्यामुळे या अनिर्णित सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर केडन्सविरुद्ध विजय मिळवला. सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी करणारा तुषार श्रीवास्तव ठरला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावरील सामन्यात आज तिसऱ्या दिवशी पूना क्‍लबचा डाव 109 षटकात 7 बाद 375 धावापासून पुढे सुरु झाला. पूना क्‍लब संघाचा डाव 117 षटकात 406 धावावर संपुष्टात आला. संग्राम अतितकरने 160 धावा, अकिब शेखने 65 धावा, ओंकार आखाडेने नाबाद 30 धावा, यश नाहरने 33 धावा, ऋषिकेश मोटकरने 33 धावा काढून संघाला पहिल्या डावात 261 धावांची आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात पीवायसी हिंदू जिमखाना संघाला दिवसअखेर 48.1 षटकात 5 बाद 216 धावापर्यंतच मजल मारता आली. यात मंदार भंडारी 50 (81), अमेय भावे 44 (79), अभिषेक परमार 44 (55), करण जाधव 35 यांनी धावा केल्या. पूना क्‍लबकडून यश नाहर 3.1-19-2, प्रशांत सिंग 13-60-2 यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पीवायसी संघाला 216 धावाच करता आल्यामुळे या अनिर्णित सामन्यात पूना क्‍लब संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. सामन्याचा मानकरी संग्राम अतितकर ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.