जेष्ठ अभिनेते अनुमप खेर यांनी सुरू केलेल्या अभिनय संस्थेला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. याविषयी आनंद व्यक्त करताना खेर यांनी सुरूवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. या संस्थेचे नाव अॅक्टर प्रिपेअर्स हे आहे, ज्यावेळी या संस्थेचे उद्घाटन झाले त्यावेळी अवघे आठ विद्यार्थी या संस्थेत होते, असे खेर यांनी सांगितले. मुंबईमध्ये ही एक अभिनय संस्था असून या संस्थेची स्थापना अनुपम खेर यांनी 2005 मध्ये केली. आज या संस्थेने २० व्या वर्षात पदार्पण केले आहे. अनेक कलाकरांना घडवण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून खेर यांनी केले आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन आणि वरुण धवन खेर यांच्या संस्थेतील माजी विद्यार्थी आहेत. खेर यांनी शुक्रवारी सांगितले की, अभिनय करिअरमध्ये 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असले तरीही, अभिनय संस्थेला आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी अभिनय संस्था असल्याचे खेर यांनी सांगितले. जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमात किंवा कार्यक्रमात लोकांना भेटतो आणि एखादा माजी विद्यार्थी माझ्याकडे येतो आणि म्हणतो की मी तुमचा 2008 च्या बॅचचा विद्यार्थी आहे तेव्हा मला वाटते की यापेक्षा मोठी ट्रॉफी असू शकत नाही.
आठवणींना उजाळा
मला विश्वासच बसत नाही की ही 20 वर्षे कशी गेली. 5 फेब्रुवारी 2005 रोजी माझी वीरा देसाई रोडवर एक खोली होती. हे माझे पहिले ऑफिस होते. सुरुवातीला माझ्याकडे फक्त 8 विद्यार्थी होते. त्यावेळी उद्घाटनासाठी यश जी, मिस्टर बच्चन, आमिर खान, अनिल कपूर आणि इतर अनेकजण कार्यक्रमाला उपस्थित होते. कदाचित त्यांना माझ्या स्वप्नात आशेचा किरण दिसला असावा म्हणून ते आले असल्याची आठवण खेर यांनी सांगितली.