कर्जपुरवठ्याने महामेट्रोला “बूस्टर’

पहिल्या टप्प्यात 1,500 कोटींचे कर्ज मंजूर

यासाठी वापरणार निधी

मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, भुयारी मार्गाच्या शाफ्टची कामे सुरू असून लवकरच बोगद्याच्या खोदाईसाठीचे टनेल बोअरिंग मशिनही पुण्यात दाखल होणार आहे. तरीही, महामेट्रोला सध्या “इआयबी’कडील सर्व साडेचार हजार कोटी रुपयांच्या कर्जाची एकावेळी गरज नसल्याने टप्प्याटप्प्याने हा निधी घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील भुयारी मार्ग आणि भूमिगत स्टेशनसाठी हा 1,500 कोटींचा निधी उपयुक्त ठरणार आहे. 

पुणे – युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंकेकडून (इआयबी) पुणे मेट्रोसाठी पहिल्या टप्प्यात तब्बल 1,500 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा (200 मिलियन युरो) मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्‍यक असलेले करार पूर्ण झाले असून फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीनंतर (एएफडी) “इआयबी’ने कर्जपुरवठ्याला मान्यता दिल्याने प्रकल्पासाठी आवश्‍यक सर्व खर्चाचे नियोजन पूर्ण झाले आहे, असे महामेट्रोने म्हटले आहे. त्यामुळे सुमारे 32 किलोमीटरच्या या प्रकल्पाचे काम आणखी वेगाने पूर्ण होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

पुणे मेट्रोसाठी 11 हजार 420 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र-राज्य सरकार आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांचा वाटा सुमारे 45 टक्‍क्‍यांच्या दरम्यान असून, उर्वरित सर्व खर्च वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज उभारून केला जाणार आहे. त्यासाठी, “इआयबी’ आणि “एएफडी’ या दोन वित्तीय कंपन्यांनी निवड केंद्र सरकारने केली होती. गेल्या फेब्रुवारीत “एएफडी’कडून कर्जपुरवठा मंजूर झाल्यानंतर आता हे कर्जही मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.