पुणे – कर्जाचे हप्ते थकल्याने कर्जदारास फायनांन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये डांबून ठेवले. ही घटना स्वारगेट येथील नटराज हॉटेलच्या मागे श्री एंटरप्रायजेस कंपनीच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी शुभम शिंदे व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी वसीम शब्बीर बेग(28,रा.केडगाव, ता. दौंड) याने महिंद्रा फायनांन्स कंपनीकडून कारसाठी लोन घेतले होते. याचे आठ हप्ते थकल्याने आरोपींनी त्याला कार्यालयात बोलावून घेतले होते.
तेथे त्याला हप्ते भरण्यास सांगून गाडी जमा करण्यास सांगण्यात आले. फिर्यादीने हप्ते भरण्यास पैसे नसल्याचे सांगितल्याने त्याला काही तास कार्यालयातच डांबून ठेवण्यात आले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाय करत आहेत.