नगर -कमी वेळात योग्य उपचार पद्धती राबवून रूग्णाला लवकर करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे. डॉ.पानसंबळ यांनी हे निसर्ग करोना सेंटर तयार केले हे कौतुकास्पद आहे. व जास्तीत जास्त डॉक्टरांनी याचे अनुकरण करावे, जेणेकरून करोना नायनाट होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.
करोनाबाधित रुग्णांवर येथे उपचार करण्यासाठी शहरात नव्याने हॉटेल क्रिष्णा एक्झॉटीका येथे निसर्ग करोना उपचार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. खा. डॉ. सुजय विखे यांनी या केंद्राची पाहणी केली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. सतिष सोनवणे, डॉ.प्रशांत पटारे, ऍड.धनंजय जाधव, संचालिका गणेश डॉ.अदिती पानसंबळ, डॉ. विक्रम पानसंबळ, राहुल मुथा, स्वप्नील अंकम, दिनेश नल्ला, रुपेश येनगुपटला आदी उपस्थित होते. डॉ.अदिती पानसंबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र कार्यान्वित झाले आहे.