मुंबई – पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या ऊर्जा क्षेत्रावर भर देणाऱ्या वित्तीय संस्थेची 15 जानेवारी पासून सिक्युअर्ड, रीडीमेबल, नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सची (एनसीडी) खुली विक्री सुरु होणार आहे.
बेस इश्यू 500 कोटी रुपये असून, 4,500 कोटी रुपयांपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन करण्याचा पर्याय असल्याने एकूण रक्कम 5000 कोटी रुपयांपर्यंत आहे. एनसीडींचे दर्शनी मूल्य प्रत्येकी 1,000 आहे. निर्णयानुसार इश्यू लवकर बंद करण्याचा किंवा त्यास वाढीव मुदत देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
एनसीडींच्या सर्व सीरिजसाठी मिळून किमान अर्जाचे प्रमाण एकूण 10,000 रुपयांच्या 10 एनसीडी असे आहे आणि किमान अर्जानंतर प्रत्येकी 1000 रुपयांच्या दर्शनी मूल्यासाठी एक (1) एनसीडीच्या पटीत अर्ज करता येईल.
विकलेल्या एनसीडींची नोंदणी बीएसईवर केली जाणार आहे. केअर, क्रिसिल व आयसीआरए यांनी एनसीडींना चांगले रेटीग मिळाले आहे.