“सरकारच्या दुर्लक्षामुळेच राज्यभर मृत्यूतांडव”

मुंबई – राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व बाबींना भाजपने सरकारला जबाबदार धरले आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच राज्यभर मृत्यूतांडव सुरु असल्याचे भाजपने ट्विट करून म्हटले आहे.

“नगर जिल्ह्यात एकाच दिवशी ४२ कोरोना रुग्णांवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. येथील २ विद्युत दाहिनीत २० आणि उरलेले मृतदेह लाकडाच्या सरणावर रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, नगरमध्ये चार-चार मंत्री असूनही कोरोनामुळे रुग्ण मरत आहेत. मात्र @OfficeofUT शांत !” असे ट्विट करून भाजपने राज्यसरकारवर टीका केलीय.

महाराष्ट्र भाजपने केल्या ट्विटसोबत एक फोटो जोडलेला आहे. त्यात नगरमधील भयाण अवस्था मांडण्यात आली आहे. एकाच शववाहिकेत सहा मृतदेह कोंबले जात आहेत… स्मशानात रांगांच्या रांगा लागत आहेत… जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ… हे सर्व सरकारच्या दुर्लक्षामुळेच होतेय असे म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.