नाशिकमध्ये भीषण अपघात माय-लेकाचा मृत्यू

नाशिकमध्ये भीषण अपघात माय-लेकाचा मृत्यू

नाशिक – नाशिक-औरंगाबाद मार्गावर कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे तर अन्य तीनजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे कुटुंब करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाशिक येथून आपल्या गावी पैठण तालुक्‍यातील बिडकीनला जात होते.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या भीतीने जाधव कुटुंबांनी पैठण येथे आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.

यावेळी गाडीत चालकासह चारजण प्रवास करत होते. यादरम्यान गाडीचा टायर फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटले. यानंतर कार पुलावरुन जाऊन आदळली आणि भीषण अपघात झाला. गीता जाधव आणि विराज जाधव असे मृत आई, मुलाचे नाव आहे. तर जखमींमध्ये विराट जाधव, मयूर जाधव आणि कार चालकाचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.