नवी दिल्ली – दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांना पुन्हा एकदा धमक्या आल्या आहेत. राजस्थानमधून ईमेल पाठवून धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर मानसा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंजाब पोलिसांनी बलकौर सिंगला ईमेलद्वारे धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती. आरोपी महिपाल राजस्थानमधील जोधपूरचा असून त्याला दिल्लीतील बहादूरगड येथून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची गेल्या वर्षी २९ मे रोजी हत्या झाली होती. मुसेवाला आपल्या मित्रासोबत जीपने आपल्या गावी जात होते, पण वाटेत अनेक सशस्त्र लोकांनी त्याला घेरले आणि गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यामुळे मुसेवाला यांचा जागीच मृत्यू झाला.